स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत नोकरी करावी, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे आता हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला १ कोटी रुपयांचे पॅकेज मिळणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ११ जुलै २०२५ पासून सुरु झाली आहे. त्यानंतर आता तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहात. तुम्ही sbi.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
स्टेट बँकेची स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर भरती मोहिमेअंतर्गत एकूण ३३ पदे भरली जाणार आहेत. यातील १८ पदे ही डेप्युटी मॅनेजर पदासाठी आहेत. यानंतर असिस्टंट वाइस प्रेसिडंटसाठी १४ पदे रिक्त आहेत. जनरल मॅनेजर पदासाठी १ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
जनरल मॅनेजर पदासाठी कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग / सॉफ्टवेअर इंजिनियरिंगमध्ये बीई पदवी प्राप्त केलेली असावी. ही पोस्टिंग हैदराबाद येथे होणार आहे.
असिस्टंट वाइस प्रेसिडंट पदासाठी उमेदवारांनी बी.ई / बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनियर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स डिग्री प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी ४४ लाख रुपयांचे पॅकेज असणार आहे.
डेप्युटी मॅनेजर पदासाठी उमेदवारांनी बी.ई/ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनियरिंग, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी तुम्हाला MMGS-II स्केलनुसार पॅकेज मिळणार आहे.
या नोकरीसाठी इच्छुकांनी वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.


