सिस्पे घोटाळ्यावरून सुजय विखेंचा निलेश लंके यांना टोला
आहिल्यानगर
सिस्पे घोटाळ्यातील आरोपींना निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढल्याचा दावा खासदार निलेश लंके यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी लंके यांच्यावर जोरदार पलटवार केला.
“डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, बल्कि नामुमकिन था. पण ही नामुमकिन गोष्ट खासदारांनी केली असेल, तर त्यांना नक्कीच रॉचे अध्यक्ष करायला पाहिजे,” असा उपरोधिक टोला सुजय विखे यांनी लगावला.
लंके यांच्या कार्यकर्त्यांनी आरोपी शोधून काढल्याच्या दाव्यावर विखे यांनी उपरोधाच्या माध्यमातून निशाणा साधत, आता सीबीआय आणि रॉच्या तपास यंत्रणांचे नेतृत्वच खासदारांकडे देण्याची वेळ आली म्हटले आहे.


