onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -15-08–2026 एकुण कांदा गोणी -69,403
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 3200 ते 3600
2.नंबर= 2100 ते 3200
3 नंबर= 1300 ते 2100
4 नंबर= 700 ते 1300
————————————————————————————————————————————————–
जलसंधारण सप्ताहातून ‘जलसाक्षर’ अहिल्यानगरचा संकल्प!
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोगोचे अनावरण; नागरिकांना जलसंधारणाची शपथ -२१ ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन’
अहिल्यानगर,: महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या संकल्पनेतून माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाची आज अहिल्यानगर जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली.
जलसंधारण सप्ताहाचे औचित्य साधून आज स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते जलसंधारण सप्ताहाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना जलसंधारणाची शपथ देण्यात आली. जलसंधारणाचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून जलसाक्षर समाज निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
जलसंधारण सप्ताहाच्या कालावधीत जिल्ह्यात विविध जनजागृतीपर आणि लोकसहभागात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शाळांमध्ये जलसंधारण विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला व पोस्टर स्पर्धा तसेच वाद-विवाद स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जलपूजन, वृक्षारोपण यांसारखे उपक्रम राबवून विद्यार्थी, युवक आणि नागरिकांमध्ये जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून त्याचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन, जलसाठ्यांचे संवर्धन, मृद व जलसंधारणाच्या उपाययोजनांचा प्रभावी वापर आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जागरूकता निर्माण करण्यावर सप्ताहात विशेष भर देण्यात येणार आहे.
२१ ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’
जलसंधारण सप्ताहाचा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून २१ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा मुख्यालयी ‘महा वॉकेथॉन’ आयोजित करण्यात आली आहे. ‘माती वाचवा, पाणी वाचवा, उद्याचे भविष्य सुरक्षित करा’ या संदेशातून जलसंधारणाचा विचार जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न या वॉकेथॉनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, युवक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
जलसंधारण सप्ताहाच्या माध्यमातून ‘पाणी वाचवा- भविष्य वाचवा’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यावेळी महापौर ज्योती गाडे, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते,जिल्हा जलसंधारण अधिकारी
पांडुरंग गायसमुद्रे आदी उपस्थित होते.


