शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत? जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी काल (14 जुलै) रात्री अचानक ‘वर्षा’वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तिन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आलं.

जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या तिन्ही नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांची वेगळी बैठक झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे. सुरुवातीला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ जयंत पाटील देखील वर्षावर पोहोचले. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत तिन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समोर आला नाही. या भेटीवर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत बैठक झालेली नाही. इस्लामपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष अपात्र ठरवल्यानं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती जयंत पाटलांनी एबीपी माझाला दिली आहे. माझा आणि प्रफुल पटेल तटकरे भेटीचा संबंध नाही. इस्लामपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष अपात्र ठरवल्या प्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रात्री साडे दहा वाजता वर्षा निवासस्थानी पोहोचलो आणि पावणे अकरा वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर पडलो. मुख्यमंत्र्यांची 5 मिनिटं चर्चा करून बाहेर पडलो. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल त्याठिकाणी असल्याची कोणतीही मला माहिती नव्हती, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles