बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला मुंबई-पुणे महामार्गावर किरकोळ अपघात झाला आहे. याबाबत त्यांनी स्वतः X या सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. तसंच, ज्या वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली त्या वाहनाचा नंबर प्लेटही सुप्रिया सुळेंनी शेअर केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर GJ13CF5257 या वाहनाने बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे माझ्या गाडीला बाजूने धडक दिली.”
त्या पुढे म्हणाल्या, “हा एक अत्यंत वाईट अनुभव होता. सुदैवाने, सर्वजण सुरक्षित आहेत. अशा घटना हा एक गंभीर इशारा आहे की, आपल्या रस्त्यांवरील अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे असंख्य लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. मी सर्वांना आवाहन करते की, सीट बेल्ट लावा, सतर्क राहा आणि जबाबदारीने वाहन चालवा, जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित राहतील.”
१ मे रोजी मुंबईहून पुण्याच्या दिशेनं एक्स्प्रेस वेवरून निघालेल्या सुप्रिया सुळे यांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. यावरूनही त्यांनी संताप व्यक्त केला होता. १ मे रोजीच मिसिंग लिंकचं उद्घाटन करण्यात आलं. नेमक्या त्याच दिवशी वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले. मिसिंग लिंकच्या उद्घाटनाआधीच खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. यामध्ये सुप्रिया सुळेही अडकल्या होत्या.
https://x.com/supriya_sule/status/2053143239696544007?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2053143239696544007%7Ctwgr%5Ecca37ce4dc1f1dca4e339ddda62debf4a52eb4d0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fsupriya-sule-car-accident-mumbai-pune-expressway-updates-plate-number-shared-sgk-96-5888616%2F
सुप्रिया सुळे यांच्या गाडीला मुंबई-पुणे महामार्गावर अपघात,धडक देणाऱ्या वाहनाची नंबर प्लेटही केली शेअर!
- Advertisement -


