प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा…; सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावूक करणारी पोस्ट; म्हणाल्या

रक्षाबंधनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्यासाठी भावनिक पोस्ट केली आहे. सात महिन्यांपूर्वी अजित पवार यांचं बारामतीजवळ विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे पवार कुटुंबाबरोबरच अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. अजित पवारांच्या निधनानंतरच्या या पहिल्याच रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे मोठ्या भावासाठी भावनिक झाल्या असून त्यांनी अजित पवारांच्या आठवणीत एक पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे.

आज राखीपौर्णिमा…पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं…यावर आजही विश्वास बसत नाही, अशी भावूक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील…तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे…असं सुप्रिया सुळे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाल्या

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles