थलापतिच्या विजयानंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णनची चर्चा….काय आहे नेमकं कनेक्शन

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय थलापति यांच्या पक्षाने दणदणीत विजय मिळवत सर्वांना चकित केले आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेला त्यांचा पक्ष सत्तेवर आला आहे.‌ दरम्यान थलपतीच्या विजयानंतर त्यांच्या
राजकीय यशाबरोबर खासगी आयुष्याची सुद्धा जोरदार चर्चा आहे. पत्नीसोबत घटस्फोटच्या खटल्याची केस कोर्टात आहे. त्याचं नाव अभिनेत्री सहकलाकार त्रिशा कृष्णन सोबत जोडलं जातय. लवकरच दोघे लग्न करणार अशी चर्चा आहे.

लग्न कधी करणार? लग्न का नाही केलं? वयाची तिशी आली लग्न कधी करणार? लोक अशा पद्धतीने विचारतात. लोकांची विचारण्याची ही पद्धत मला अजिबात आवडत नाही.तुम्ही असं विचाराना तुला लग्न कधी करायचय?” असं त्रिशा कृष्णन एका मुलाखतीत म्हणाली.
मी एखाद्या माणसाला भेटल्यानंतर या माणसाबरोबर आयुष्यभर मला रहायचय असं वाटलं पाहिजे. माझा घटस्फोटावर विश्वास नाही. मला घटस्फोट घ्यायचा नाहीय” असं त्रिशा कृष्णनने सांगितलं. तिच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय. त्यात तिने हे सर्व म्हटलय.

माझ्या आसपास अनेक लग्न झालेली जोडपी आहेत. माझे मित्र-मैत्रिणी आहेत, जे लग्न करुन नाखुश आहेत. त्यांची वेगवेगळी कारणं आहेत. मला माझ्या आयुष्यात असं नकोय. त्यापेक्षा मी योग्य माणसासाठी थांबेन. ज्यावेळी योग्य माणूस भेटेल, त्यावेळी लग्न करीन. नाही मिळाला तरी चालेल” असं त्रिशा कृष्णनने म्हटलेलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles