शाळेच्या मधल्या सुट्टीतच शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल; शाळेतच गळफास घेत आत्महत्या

जळगावच्या पाचोऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेतील ही घटना असून रवींद्र महाले असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुपडू भादु विद्या मंदिर शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान विद्यार्थी प्रांगणात खेळत होते. यावेळी शिक्षक रवींद्र महाले यांनी दुसऱ्या मजल्यावरील वर्ग खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. मधली सुट्टी संपल्यानंतर गळफास घेतलेल्या अवस्थेत रवींद्र महाले हे वर्गात आढळून आले आहे.

शाळा सुरू असतानाच ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मानसिक तणावातून शिक्षकाने टोकाची भूमिका घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

एक दिवसआधी बाहेरगावी असलेल्या मुलीला घरी बोलावलं
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्षकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे. रवींद्र महाले हे पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील रहिवासी होते. ते पाचोरा येथील सुपडू बहादू शाळेत कार्यरत असल्याने गेल्या काही वर्षापासून ते शहरातील गिरणा पंपिंग रोडवर वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांची मुलगी बाहेरगावी शिक्षण घेत आहे. शिक्षक महाले यांनी एक दिवस आधी मुलीलाही घरी बोलावून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles