एलपीजी सिलिंडरवर सरकार देतंय तब्बल ७०० रुपयांची सबसिडी? समोर आली मोठी माहिती

जुलै २४ रोजी घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात LPG च्या किंमती वाढलेल्या असतानाही देशातल्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर कमी किंमतीत उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना महागाईचा जास्तीत जास्त भार सहन करावा लागत नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी संसदेत सांगितलं की, पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जागतिक बाजारात LPG च्या किमती वाढलेल्या आहेत. तरीही सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर नियंत्रित ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, जून २०२६ मध्ये १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलेंडरची बाजारभावानुसार किंमत १६९५ रुपये इतकी होती. मात्र ग्राहकांना तो सिलेंडर फक्त ९४२ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. म्हणजेच प्रत्येक सिलेंडरमागे ७०० रुपयांपेक्षा जास्तीचा भार सरकार आणि सरकारी तेल कंपन्या उचलतात.

सध्या दिल्लीमध्ये घरगुती LPG सिलेंडरची किंमत ९४२ रुपये असून व्यावसायिक सिलेंडर २९३० रुपयांना उपलब्ध आहे. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर ९४१.५० रुपये आणि व्यावसायिक सिलेंडर २८८२ रुपये आहे. तर बेंगळुरूमध्ये घरगुती सिलेंडर ९४८.५० रुपये आणि व्यावसायिक सिलेंडर ३००६ रुपयांना मिळणार आहे.

सरकारने असंही स्पष्ट केलं की, आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि २०२६ – २७ दरम्यान तेल विपणन कंपन्यांना या सवलतीसाठी सुमारे ३०००० कोटी रुपयांची भरपाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना वाढत्या आंतरराष्ट्रीय दरांचा थेट परिणाम सहन करावा लागत नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles