दिवंगत नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुपुत्र खासदार पार्थ पवार यांच्या लग्न समारंभाचा आणि साखरपुड्याचा मुहूर्त ठरला आहे. खासदार पार्थ पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार आहे. त्यापूर्वी २९ जुलैला अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईकांच्या आणि फक्त निमंत्रितांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडणार आहे.
हिंदू कुटुंबात वडिलांचे किंवा आईचे निधन झाल्यानंतर, कुटुंबात जर लग्नकार्य होणार असेल तर, एका वर्षाच्या आत विवाह करणे आवश्यक असते अन्यथा पुढील तीन वर्षे घरात लग्नकार्य करता येत नाही अशी समजूत प्रचलित आहे. या संदर्भात करवीर पीठाचे शंकराचार्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. करवीर शंकराचार्य पीठाचा छत्रपती शाहू महाराजांशी ऐतिहासिक संदर्भ असल्याने या लग्नकार्याच्या संबंधित प्रचलित रूढी, परंपरा तथा समजूती संदर्भात वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी मार्गदर्शन घेण्यात आल्याचे पार्थ पवार यांच्या वतीने सांगण्यात आले.कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यावर धर्मशास्त्रानुसार आवश्यक ते विधी आणि संस्कार योग्य प्रकारे पार पाडणे गरजेचे असते. परंतु एका वर्षाच्या आत विवाह करणे बंधनकारक नसते. त्यामुळे या संदर्भात कोणताही गैरसमज ठेवण्याचे कारण नाही, असे शंकराचार्यांनी सांगितल्याचे पार्थ पवार यांच्या वतीने सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार आणि कायनात धार यांच्यातील नात्याची जोरदार चर्चा होती. सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांच्या लग्न समारंभातही पार्थ पवार यांच्यासोबत कायनात धार दिसली होती. तसेच याआधीही पार्थ पवार आणि कायनात धार मध्य प्रदेशात महाकाल मंदिरात दर्शन घेण्यासाठी एकत्र गेले होते. तेव्हाच खरे तर त्यांच्यातील प्रेम संबंधांची चर्चा झाली होती.
पार्थ पवार-कायनात दारा यांच्या लग्नाचा मुहूर्त आणि साखरपुड्याची तारीख ठरली
- Advertisement -


