एकाच वेळी 3 पोलिस लाच घेताना पकडले; श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एसीबीची धडक कारवाई

श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील 3 कर्मचारी 7 हजारांची लाच घेताना एसीबीकडून रंगेहाथ पकडले

अहिल्यानगर,: श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील दादा म्हस्के, नितीन गाडगे आणि राजेश जाधव या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 7 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

एकाच वेळी तीन पोलिस लाच घेताना सापडण्याची ही श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या इतिहासातील बहुधा पहिलीच घटना म्हणावी लागेल.

अपघात गुन्हा नोंदसाठी मागितली लाच
एसीबीच्या माहितीनुसार, अपघाताच्या गुन्ह्यातील एका प्रकरणाची नोंद लावण्यासाठी या तिघांनी 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज हे तीन लाचखोर पोलिस कर्मचारी रंगेहाथ पकडले गेले.

या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles