तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ मध्ये, तीन दिवसात 53 धाडी अन् भेसळ करणारे 33 जण अटक

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी कार्यभार घेताच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना धाडी व जप्तीची विशेष मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिलेले होते. त्यानुसार राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात अभूतपूर्व, अशी धडक कारवाई सुरू आहे.

गत तीन दिवसांत तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकून प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, भेसळयुक्त दूध, नियमबाह्य खाद्यपदार्थ, असुरक्षित उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारे पॅकिंग यावर कठोर कारवाई केलेली आहे.

या मोहिमेत गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या प्रकरणी ५३ आस्थापनांची तपासणी केलेली असून त्यातील ३४ ठिकाणी गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री होत असल्याचे आढळून आले. एकूण २५ एफआयआर दाखल करून ३३ व्यक्तींना अटक केलेली आहे. ५ वाहने जप्त करून २७ आस्थापना सील केलेल्या आहेत.

या प्रकरणी सुमारे २०,५७,२९६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे, त्यापैकी बृहन्मुंबई विभागात १९ आस्थापनांची तपासणी करून १९ आस्थापना सील केलेल्या आहेत, १९ व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या व्यतिरिक्त प्रशासनाच्या बृहन्मुंबई, कोंकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागातील अधिकाऱ्यांनी २३ आस्थापनांची तपासणी करून पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नुडल्स, कार्बोनेटेड वॉटर, खाद्यतेल, स्वीट व फरसाण, आईसक्रीम, ताडी, डिंक, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन व बेकारी पदार्थ या अन्नपदार्थाचा सुमारे २८ लाख ७८ हजार ५७२ रुपये किंमतीचा साठा जप्त करून त्याचे विश्लेषणासाठी नमुने घेतले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles