स्थानिक गुन्हे शाखेकडुन उंबरे ता. राहुरी येथे गावठी कट्टा बाळगणारे ०२ इसम ताब्यात. १०१ गावठी कट्टा, २ काडतुस, असा एकुण ५,५२,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश देण्यात आलेले आहेत,
सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमिझराजा आतार, अरुण मोरे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना करण्यात आले होते.
दिनांक २०/०४/२०२६ रोजी वरील पथक हे राहुरी तालुक्यामध्ये अवैध अग्निशस्त्रांची माहिती काढ़त असतांना पथकास इसम नामे विशाल पालवे व सोमनाथ मोरे दोन्ही रा. नेवासा हे गोटुंबे आखाडा, ते शनिशिंगणापुर जाणारे रोडवर पांढऱ्या रंगाचे गाडीमध्ये विनापरवाना गावठी कट्टा कब्जात बाळगुन फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली, पथक सदर वाहनाचा व बातमीतील इसमांचा शोध घेत असतांना सदरचे वाहन हे उंबरे ता. राहुरी, येथील हॉटेल माऊली परिसरामध्ये थांबलेले असल्याचे दिसुन आले, पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये दोन संशयीत इसम बसलेले दिसुन आले. पथकाने सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १) विशाल वसंत पालवे वय २८ वर्षे, रा. झापवाडी रोड, घोडेगांव, ता. नेवासा, २) सोमनाथ भानुदास मोरे वय ३२ वर्षे, रा. शनिशिंगणापुर, ता. नेवासा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
पंचासमक्ष सदर इसमांची झडती घेता त्यांचे कब्जामध्ये ३०,०००/- रुपये किमतीचा एक गावठी कट्टा (अग्निशस्त्र), २०००/- रुपये किमतीचे ०१ जिवंत काडतुस, ०१ मिस फायर झालेले काडतुस, २०,०००/-रुपये किमतीचे दोन अॅण्ड्राईड मोबाईल फोन, ५,००,०००/- रुपये किमतीची एक सुझुकी कंपनीची XL६ कार असा एकुण ५,५२,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीविरुध्द पोकों/२६४६ भगवान बाळासाहेब थोरात नेम नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुरी पोलीस ठाणे गु.र.नं. ३९७/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


