पारनेर शहरामध्ये तिरट जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापा ; 6 जुगारी जेरबंद

पारनेर शहरामध्ये तिरट जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापा
6 आरोपींकडून 42,000/- रु. चा मुद्देमाल जप्त

पारनेर : प्रतिनिधी

मा. श्री. मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

पो.नि. श्री. संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदिप दरवडे यांच्या पथकाला अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

दिनांक 19/07/2026 रोजी पथक पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत पारनेर मार्केट जवळील राजु बांबु हाऊस हॉटेलच्या वरच्या माळ्यावर काही इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार पत्त्यांवर पैसे लावून खेळत असल्याची माहिती मिळाली.

पथकाने तात्काळ ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम तिरट जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्यावर छापा टाकून 6 इसमांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यातील आरोपींची नावे:
1) अजीम अमीन शेख वय-57 वर्षे रा. फकीरवाडा, पारनेर
2) तुकाराम दत्तु चव्हाण वय-48 वर्षे रा. वरखेड मळा, पारनेर
3) मोबीन अब्दुलरहीम शेख वय-43 वर्षे रा. मार्केट यार्ड जवळ, पारनेर
4) राहुल उर्फ सुनिल पोपट औटी वय-28 वर्षे रा. वरखेड मळा, पारनेर
5) सुहास काशीनाथ मेहर वय-32 वर्षे रा. संभाजीनगर, पारनेर
6) मज्जीद अमीन शेख वय-52 वर्षे रा. फकीरवाडा, पारनेर

ताब्यातील आरोपींकडून तिरट जुगार खेळण्यासाठी वापरलेली 42,000/- रु. रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यातील आरोपींविरुद्ध पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं.550/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles