नगर शहरातील गोळीबार-हल्ल्यात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग

अहिल्यानगर-सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता परिसरात रविवारी (24 मे) सकाळी व्यावसायिक चिरंजीव दत्तात्रय गाढवे (वय 31, रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) यांच्यावर झालेल्या हल्ला व हवेत गोळीबार प्रकरणात तोफखाना पोलिसांनी भिंगार परिसरातील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी आणखी दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. मात्र, उर्वरित दोन संशयित आरोपी अद्याप पसार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या अल्पवयीनांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून, त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. गाढवे यांची एमआयडीसी निंबळक बायपास परिसरात कंपनी असून, ते 24 मे रोजी सकाळी मित्रासोबत चहा-नाश्त्यासाठी बाहेर गेले होते. पाईपलाईन रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिराजवळील पुणेरी चहा या दुकानात ते थांबले असताना अचानक तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. यातील एका हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांच्या पाठीवर वार केला. त्यानंतर दुकानात घुसून मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर संशयितांनी पळ काढताना हवेत गोळीबार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

घटनेनंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शहर उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे व निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यानंतर चार संशयित एका दुचाकीवरून आल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपास व माहितीच्या आधारे पोलिसांनी एकाला पाथर्डीतून व दुसर्‍याला भिंगारमधून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी भिंगारमधील आणखी दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या दोघांचा शोध सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles