‘हलगी वाजती’ गाण्यावर रेड चिली गर्ल्स ग्रुपच्या चिमुकल्यांचा नादखुळा डान्स

डान्स, संगीत, अभिनय यांसारख्या कला क्षेत्रात आपलं नाव मोठं करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सोशल मीडियावर लाखो युजर्स अशा विविध कला सादर करीत असतात, ज्यातील काही मोजकेच लोक लोकप्रिय होतात.

लहान मुलांचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो ज्यात ती बिनधास्त स्टेजवर डान्स करताना किंवा गाणं गाताना, अभिनय सादर करताना दिसतात. चिमुकल्यांच्या या व्हिडीओवर लाखो व्ह्यूज आणि लाइक्सही मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय ज्यात एक काही लहान मुली सुंदर डान्स करताना दिसतेय

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सात लहान मुली एका मोठ्या स्टेजवर खूप सुंदर डान्स करत आहेत. यावेळी त्यांनी लाल रंगाची नऊवारी साडी, हिरवा ब्लाऊज, केसात गजरा, नाकात नथ असा संपूर्ण मराठमोळा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे. डान्सची सुरूवातच त्या इतकी सुंदर आणि भन्नाट करतात की त्यांचा डान्स पाहून समोर बसलेले सर्व प्रेक्षक मोठमोठ्याने ओरडून त्याला प्रोत्साहन देत आहेत. यावेळी त्या मुली “हलगी वाजती” या गाण्यावर नाचत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official_shreekarade या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या डान्स करणाऱ्या मुलींच्या ग्रुपचे नाव’ रेड चिली गर्ल्स’ आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles