विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा,कोणाला उमेदवारी मिळणार?

विधान परिषदेसाठी आज भाजपची खलबतं होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची आज रात्री १० वाजता वर्षा निवासस्थानी बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नावांची चर्चा बैठकीत पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे आजच्या बैठकीतील चर्चेनंतर भाजपकडून काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जाणार असल्याची चर्चा आहे. विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला १० पैकी ६ जागा मिळणार आहेत. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी नावांची चर्चा बैठकीत पार पडणार आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. इतर ५ नावांवर चर्चा होत असताना जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा देखील विचार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विधान परिषदेसाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली अशून गाठीभेटींना देखील वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्यांच्या सह्याद्री अतिथीगृह आणि काल मुंबईतील मेळाव्यात गाठीभेटी पार पडल्या. माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी यांच्या नावांची चर्चा आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles