Wednesday, February 11, 2026

हायरल व्हिडिओ….बकरी अशी थिरकू लागते की…

सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यावर लोक सहजासहजी विश्वास ठेवू शकत नाहीत. तुम्ही अनेकांना हेडफोन्स घालून गाणी ऐकाताना पाहिलं असेल पण कधी कोणत्या प्राण्याला हेडफोन घालून गाणी ऐकताना पाहिलंय का? नाही ना…मग हा व्हिडीओ पाहा, ज्यात एक बकरी हेडफोन्स घालून गाणं ऐकताना दिसून आली.

हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक बकरी दिसत असून बकरीच्या कानात यावेळी हेडफोन्स घातल्याचे दिसून येते. हेडफोन्सवर यावेळी गाणं सुरु असतं आणि गाणं वाजताच गाण्याच्या तालावर बकरी अशी थिरकू लागते की पाहून सर्वांचेच डोळे विस्फारतात. याआधी कधीही कोणी बकरीला नाचताना पाहिले नाही ज्यामुळे तिला असे गाण्यावर थिरकताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गाण्याचा आनंद घेत बारीक अगदी आनंदात गाण्याची मजा लुटत आहे

हा व्हिडिओ viral_india.official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये बकरीलाही गाण्यांची आवड असं लिहलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनाही हसू आवरत नाहीये. सोशल मीडिया वापरकर्ते या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles