सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला वेळात वेळ काढून डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. आता अशाच एका महिलेचा डान्स व्हायरल होतोय, ज्यात ती तिच्या पतीबरोबर नाचताना दिसत आहे.
सोशल मीडियामुळे पती-पत्नीमधील भांडणं, प्रेम, मजामस्ती अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एकवेळ पती-पत्नीचे गुण नाही जुळले तरी चालेल पण त्यांची आवड-निवड जुळायला हवी. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
पती-पत्नीमधील प्रेम वयानुसार वाढताना दिसतं. एकमेकांबरोबर राहणं, मनातल्या गोष्टी शेअर करणं, एकमेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहन देणं आपल्या जोडीदाराच्या पाठीशी उभं राहणं. या गोष्टी परिपक्व नात्यात पाहायला मिळतात. शिवाय नातं जुनं झालं तरी त्यातील प्रेम नेहमीच सदाबहार असतं. सध्या व्हारल होत असलेल्या काका-काकूंच्या केमिस्ट्रीमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काका-काकू एका शेतामध्ये “बिन सजनी के जीवन अच्छा नहीं लगता”, या बॉलिवूड गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करत आहेत. यावेळी काक-काकूंच्या काही रोमँटिक स्टेप्स देखील पाहायला मिळाल्या. शिवाय त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावही लक्ष वेधून घेणारे आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @samiranmini या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.


