लग्नाचा सीझन सुरू झाला की सोशल मीडियावर दररोज भन्नाट व्हिडीओ येत असतात. कधी नवरदेवाच्या डान्समुळे लोक हसतात, तर कधी नवरीचे मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, यावेळी सोशल मीडियावर जो व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे तो पाहून लोक अक्षरशः पोट धरून हसत आहेत. एका नवरदेवा बरोबर असे काही घडले की बघणाऱ्यांना हसू आवरणं कठीण झालं.
हा व्हिडीओ लग्नात घडलेल्या एका मजेदार प्रसंगावर आधारित आहे. नेहमी नवरीकडच्या मंडळींची बूट चोरायची स्टाईल असते, पण इथे वेगळंच घडलं. लग्न सुरू असतानाच नवरदेवाचे डोके आणि त्याचा विग याच्यावर एका मांजरीची नजर पडली. या अनोख्या आणि भन्नाट प्रसंगामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
https://x.com/WasiuddinSiddi1/status/1995121659960086532?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1995121659960086532%7Ctwgr%5Ea35017a5a954ea725f0713205657d2a892f6f52f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fgroom-wig-snatch-by-cat-viral-wedding-video-funny-moment-india-sap-05-5553752%2F
व्हिडीओत दिसते की, नवरदेव आनंदाने लग्नात उभा असतो. डीजे, नाच, गोंधळ यामध्ये सगळे खुशीत असतात. अचानक कुठूनतरी एक मांजर धावत येते आणि थेट नवरदेवाच्या डोक्यावर झेप घेते. एका क्षणात ती त्याच्या डोक्यावरचा हेअर विग ओढून काढते आणि पळून जाते.मांजर विग घेऊन पळताच नवरदेवही स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी तिला पकडायला मागे धावतो. हा सीन इतका अनपेक्षित आणि मजेदार आहे की बघणारे स्वतः पोट धरून हसू लागतात. काही लोक तर म्हणतायत, मांजर जणू त्याची इज्जतच घेऊन पळाली! सोशल मीडियावर अनेक लोक म्हणतायत की, व्हिडीओ कदाचित AI ने बनवलेला आहे. पण खरं-खोटं काहीही असो, हा व्हिडीओ बघून लोक मात्र खूप मजा घेत आहेत.हा व्हिडीओ ट्विटरवर @Wasiuddin Siddil नावाच्या युजरने पोस्ट केला आहे


