राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; रोहित पवार राष्ट्रवादी सोडणार? रोहित पवारांचं मोठं विधान

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असून, राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत जाऊ शकतो अशी चर्चा अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झाली होती. अखेर बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आहे की नाही? यावर पक्षाच्या वरिष्ठांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. यावर अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीन होऊन भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर ) सत्तेत गेल्यास मी दुसरा पर्याय निवडेल, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. रोहित पवार यांनी नुकतीच लोकमतच्या महापंचायतमध्ये मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांना भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना जर शरद पवार यांचा पक्ष विलीन होऊन एनडीबरोबर गेल्यास मी दुसरा पर्याय निवडेल, पण भाजपाबरोबर जाणार नाही, असे रोहित यांनी स्पष्ट केले. त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही काँग्रेससोबत जाणार का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नावर उत्तर देणे त्यांनी टाळले. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, हे विलीनीकरण होणार नसल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles