अहिल्यानगर माळीवाडा परिसरात दुकानात गेलेल्या महिलेचा विनयभंग

अहिल्यानगर -माळीवाडा परिसरात दुकानात बॅग घेण्यासाठी गेलेल्या 27 वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सद्दाम नावाच्या (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भिंगार उपनगरात राहणार्‍या पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी माळीवाडा परिसरातील संबंधित व्यक्तीच्या दुकानात बॅग घेण्यासाठी गेल्या होत्या.

यावेळी आरोपीने फिर्यादीला उद्देशून, तू खूप भारी दिसतेस, असे म्हटले. त्यावर फिर्यादीने तुम्ही नीट बोला, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीचा हात ओढून गैरवर्तन केले. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर महिलेने कोतवाली पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार 7 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

———————————————————————————————————————————————
एमडी ड्रग्स प्रकरणातील पसार संशयित जेरबंद
एलसीबीने पुणे जिल्ह्यातून घेतले ताब्यात
एमआयडीसी पोलिसांनी पकडलेल्या एमडी ड्रग्स प्रकरणातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील करडे (ता. शिरूर) येथून ताब्यात घेतले. तुषार उर्फ नाना अंकुश तांबे (वय 31, रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी राजस्थान येथील तरूणाकडून ड्रग्स जप्त केले होते. कारवाईदरम्यान एक संशयित पसार झाला होता. दरम्यान, जिल्ह्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांतील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक तयार करून फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ, मनोज साखरे, रोहित मिसाळ, प्रशांत राठोड व प्रताप देवकाते यांच्या पथकाने जिल्ह्यातील अभिलेखावरील फरार व पाहिजे आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान, 8 ऑगस्ट रोजी पथक आरोपींचा शोध घेत असताना बातमीदारामार्फत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती मिळाली.

या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तुषार उर्फ नाना तांबे हा पुणे जिल्ह्यातील करडे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करडे येथे जाऊन तुषार तांबे याचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या अभिलेखावर तो पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles