प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका

गेल्या 12 वर्षांपासून लोकसभा आणि राज्यसभेत एकहाती वर्चस्व ठेवणाऱ्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) शुक्रवारी धक्का बसला. महिला आरक्षणाशी संबंधित संविधानातील 131वी घटना दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारला संसदेत मंजूर करुन घेता आले नाही. हे विधेयक पारित होण्यासाठी दोन तृतीयांश मतांची गरज होती. मात्र, विधेयकायच्या बाजूने 298 आणि विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली. त्यामुळे घटनादुरुस्तीसह महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ शकले नाही. ही भाजपप्रणित रालोआ आघाडीसाठी नामुष्की मानली जात आहे.महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत एका नव्या वादाची ठिणगी पडली. ठाकरे गटाच्या माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर पक्षाच्या विरोधात जाऊन या विधेयकाचे समर्थन करणारी भूमिका घेतली. त्यांनी हे विधेयक मंजूर न झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. ठाकरे गटाच्या खासदारांनी काल या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे प्रियांका चतुर्वेदींनी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.महिला आरक्षण विधेयक मंजूर न होणे हा भारतीय लोकशाहीसाठी दु:खाचा दिवस आहे, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles