राज्यातील लाडक्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाचवेळी ३ हजार रूपयांचा लाभ जमा होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मात्र, आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3 हजार रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे तब्बल ४५ लाख लाभार्थी कमी होणार असल्याची माहिती समोर आलीय. आता लाभार्थ्यांची संख्या 1.8 कोटींवर आली आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्याप जमा न झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल या महिन्याचे दोन हप्ते एकत्र कधी जमा होणार? याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मे महिन्याच्या १५ तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यात २ महिन्याचा लाभ एकत्र जमा होईल, असे सांगण्यात येत आहे. याबाबत सरकारकडून पावले उचलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.आर्थिक वर्ष अखेर आणि e-KYC प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते वेळेवर जमा होऊ शकले नाहीत. लवकरच लाडकीच्या खात्यात पैसे जमा होतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३००० रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्र ३००० हजार रुपये जमा होणार, हप्त्याची संभाव्य तारीख आली समोर
- Advertisement -


