प्रेमप्रकरणातून MPSC चा पेपर फुटला; पेपरफुटीच्या लव्हस्टोरीने यंत्रणा चक्रावली!

MPSC पेपर लीक प्रकरणाच्या तपासात एक चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. पेपर फुटीच्या आरोपांमुळे मंगळवारी रात्री MPSC ने औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेचा पेपर फुटल्याचे आरोप सुरु होते. आता असं समोर आलय की, या पेपर फुटीला एक लव्ह स्टोरी जबाबदार आहे. एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनेतील घटनाक्रम थक्क करणारा आहे. या संपूर्ण प्रकाराला एक लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रियकराने एमपीएससीमध्ये अगदी एका खालच्या कर्मचाऱ्याशी संधान साधून हा प्रकार केल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे फुटलेला पेपर केवळ एकालाच मिळाला, अशीही माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिस याचा अधिक तपास करीत आहेत.

MPSC परीक्षेची प्रक्रिया अनेक महिने चालू असते. त्यामुळे या परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया विद्यमान अध्यक्ष रुजू होण्यापूर्वीच पूर्ण झाली होती. केवळ एकच विद्यार्थ्याकडे पेपर मिळाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष असला तरी आयोगाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ एकाकडेच पेपर गेला असतानाही इतर सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. एका प्रेम कहाणीचा हा फटका इतरही विद्यार्थ्यांना बसला आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी MPSC च्या परीक्षेची तयारी करतात. त्यासाठी प्रचंड कष्ट घेत असतात. राहण्याचे, दोनवेळच्या जेवणाचे हाल सोसून हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. दोन लोकांच्या प्रेमसंबंधांमुळे या विद्यार्थ्यांना हा मनस्ताप सहन करावा लागणं हे खूप दुर्देवी आहे.
पेपरफुटीचा आरोपी निघाला ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कार विजेता; प्रेयसीच्या ब्रेकअपचा बदला अन् 12 लाखांचा सौदा उघड
या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणामागे एक नाट्यमय लव्ह-हेट स्टोरी समोर आली आहे. अमृत पाटील यांनी कौटिल्य अकादमीच्या प्रवीण पाटील या दलालाच्या मदतीने 22 मार्चच्या परीक्षेच्या दोन दिवस आधी मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासाठी प्रश्नपत्रिका मिळवली.

ऋतुजाने प्रेमापोटी हा फुटलेला पेपर तिचा बॉयफ्रेंड आणि MPSC चाच अभ्यास करणारा विद्यार्थी गौरव पाटील उर्फ लोकेश याला दिला. मात्र निकाल जाहीर झाल्यावर ऋतुजा पाटील उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली, मात्र तिचा प्रियकर गौरव पाटील अपात्र ठरला.

ऋतुजा आता अधिकारी होईल आणि आपल्यापासून दूर निघून जाईल या भीतीपोटी, तसेच लग्नाला नकार दिल्याच्या रागातून गौरवने थेट एमपीएससीकडे पेपरफुटीची तक्रार केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles