इंदोरीकर महाराजांच्या मलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग करणारे 02 आरोपी मुद्देमालसह जेरबंद

इंदोरीकर महाराज यांचे मुलीचे लग्न ठिकाणी चैनस्नॅचिंग करणारे 02 आरोपी 2,89,500/-रु किमतीचे मुद्देमालसह जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई.

संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.362/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल असुन इंदोरीकर महाराज यांचे मुलीचे लग्न ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्याक्रमाचे वेळी फिर्यादी यांचे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे कोणीतरी अज्ञात चोरट्याने बळजबरीने चोरुन नेले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरील गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना पथकास व्यवसायिक कौशल्याचे आधारे सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे सागर सुरेश कांबळे रा. रमानगर वार्ड नं.01 श्रीरामपुर हा त्याचे साथीदारासह केला असुन तो त्याचे साथीदारासह चोरी केलेल्या सोन्याची वाटणी करण्यासाठी मोटार सायकलवर ममदापुर फाटा येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.
पथकाने तात्काळ ममदापुर फाटा येथे जावुन सापळा रचुन दोन इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्याने त्यांचे नांव 1) सागर सुरेश कांबळे वय-32 वर्षे रा. रमानगर वार्ड नं.01 श्रीरामपुर, 2) बबलु उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी वय- 36 वर्षे रा. वार्ड नं.02 श्रीरामपुर असे असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा व माझे इतर साथीदार 3) आतिक आयुब उर्फ आरीफ शेख रा. वार्ड नं.02 श्रीरामपुर(फरार), 4) सनी विलास ढोकणे रा.वार्ड नं.02 श्रीरामपुर(फरार) अशांनी मिळुन केल्याची कबुली दिली आहे.
आरोपीचे कब्जातुन 1,49,500/-रु कि.ची 11.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, 70,000/-रु कि.चे दोन मोबाईल, 70,000/- रु कि.चा मोटार सायकल असा एकुण 2,89,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करीत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चैनस्नॅचिंग करणारे आरोपीबाबत माहिती असल्यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर 0241-2416111, डायल 112 यावर कळविणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles