अहिल्यानगर भगवानबाबा मल्टीस्टेटमध्ये ४५ कोटींची फसवणूक; १४ आरोपींचा जामीन फेटाळला; संचालक वैद्य अटकेत

भगवानबाबा मल्टीस्टेटमध्ये ४५ कोटींची फसवणूक; १४ आरोपींचा जामीन फेटाळला

अहिल्यानगर – भगवानबाबा मल्टीस्टेटच्या नावावर गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या १४ जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

नितीन सोमनाथ उरे, जवाहरलाल मधुर वैभव, राम लक्ष्मण पोटभरे, किशोर अनिल सुखदेव, दिनेश श्रीधर वैद्य, योगेश तुकाराम गायकवाड, अनिल कचरू तिरसे, पार्वती महादेव राऊत, वैशाली योगेश गायकवाड आणि अनिशा महादेव सुकाळे यांच्यासह १४ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून हे सर्व संबंधित बालानाथाची व पाथर्डी परिसरातील रहिवासी आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित पसार झाले होते. दरम्यान, दिनेश वैद्य यांच्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने पोलिसांना माहिती मिळताच त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. मंगळवारी (८ सप्टेंबर) त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने ११ सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट संस्थेच्या फसवणूक प्रकरणी तब्बल ४५ कोटींची एकत्रित तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून या प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येत आहे. फॉरेन्सिक ऑडिटचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यामध्ये आतापर्यंत सुमारे १४ कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या संस्थेमध्ये ज्या ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत उपस्थित राहून आपले जबाब नोंदवावेत, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक देवकाते यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles