Thursday, February 19, 2026

छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेली जनतेची कामे प्रशासनाकडून व्हावीत : जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया

छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेली जनतेची कामे प्रशासनाकडून व्हावीत : – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया
जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन कार्यक्रम उत्साहात साजरा
अहिल्यानगर : अतिशय धाडसी सेनानी असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. आजच्या इतके तंत्रज्ञान नसताना त्यांना आदर्श राज्यकारभार चालवला. सर्वसामान्यांना अपेक्षित राजसत्त्ता त्यांनी दाखवून दिली. त्यांच्या राज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला होता. प्रशासक म्हणूनही छत्रपतींच्या कार्यापासून प्रेरणा घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांवर कदापि अन्याय होउ नये हीच त्यांची भूमिका असाययी. महाराज अष्टप्रधानमंडळ चालवायचे. निर्णय घेताना ते अष्टप्रधान मंडळाचा सल्ला घेऊन रयतेचे हित कशात आहेत हे त्यांनी पाहिले. कोणत्याही नागरिकाला प्र्रशासनाचा जाच होणार नाही, ही बाब महत्वाची आहे. याच संकल्पनेनुसार सध्या शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. प्रशासनाची सजगता लोकापर्यंत पोहचली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ . पंकज आशिया यांनी केले.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी 6 जून हा शिवस्वराज्यभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी आशिया यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन साजरा करण्यात आला. यावेळी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्रकल्प उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, दादाभाऊ गुंजाळ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापुसाहेब नागरगोजे मनोज ससे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, अशोक कडूस,शैलेश मोरे, डॉ.दशरथ दिघे,आदी उपस्थित होते. यावेळी व्याख्याते दत्ता कुलट यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर सविस्तर व्याख्यान दिले. यावेळी भिंगार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट लेझीम, ढोल पथक सादर केले
यावेळी संभाजी लांगोरे यांनी प्रास्ताविकात शिवस्वराज्य दिनाची माहिती दिली

मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की, शासन शिवस्वराज्य दिन साजरा करीत आहे. जनतेसाठी आदर्श राज्य कसे करायचे याची त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी जवळपास 360 गड किल्ले बांधले. ते स्वत: अतिशय कसबी इंजिनिअर होते. त्यामुळेच आजही तो इतिहासाचा ठेवा आपल्याला साडेतीनशे वर्षांनीही पहायला मिळतो. विविध उपक्रम राबविताना शिवरायांच्या आदर्श राज्य पध्दतीचा उपक्रम प्रशासनाने राबविले पाहिजे. शासन आपल्या दारी अभियानातून प्रत्येक लाभार्थीला लाभ मिळेल याची काळजी घेण्याची गरज आहे. नगर जिल्ह्यात उद्दीष्टपूर्ती करून शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा सामूहिक प्रयत्न असेल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उध्दव काळापहाड यांनी केले. राहुल शेळके यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles