Sunday, December 7, 2025

‘मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे’ ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनोज जरांगे पाटलांकडून स्वागत

दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही जुनी म्हण आहे की “मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे.” कोणत्याही पक्षाचा असला, तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावे असं होतं, पण कशासाठी म्हणत होते माहिती नाही. दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे. वेगळे लढले तरी पडतात, मग एकत्र येऊन पडू द्या. पण लोकांची इच्छा आहे ना दोन ठाकरेंनी एकत्र यावं मग त्यांनी एकत्र यावं. आमचा काही फायदा नाही, एकदा होऊन जाऊ द्या, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे, दरम्यान, राज ठाकरे यांना मनोज जरांगे पाटील यांनी गुजरात दौऱ्याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, राज ठाकरे आज गुजरातवर बोलत आहेत. मात्र, पूर्वी यांनीच गुजरातचा प्रचार केला होता.

दरम्यान, मागील वेळी मोर्चा लोणावळा मार्गे मुंबई होता. मात्र, यावेळी हा मोर्चा शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेजमार्गे कल्याण ठाणे चेंबूर करुन आझाद मैदानावर धडकणार आहे. माळशेज घाटातून खाली उतरल्यावर मराठ्यांचा मोर्चा हा एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातून निघणार आहे. याबाबत विचारलं असता जरांगेंनी आम्ही निस्वार्थी भावनेनं पुढे जात आहोत. कल्याणमार्गे जवळचा रस्ता असल्याने हा मार्ग निवडला. पहिल्यापेक्षा पाचपटने अधिक संख्येने मराठा समाज या मोर्चात सहभागी असेल. अंतरवाली मार्गे आहिल्यानगर शिवनेरी,माळशेज घाट कल्याणमार्गे मुंबई धडकणार असल्याचेही म्हणाले.

मागीलवेळी मुंबईत येऊन एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली होती. यावर बोलताना आम्ही कुणाच्या सांगण्यावरुन थांबत नाही, असा टोला जरांगेंनी लावला. हा मोर्चा शिंदे ना टार्गेट आहे असे छक्केपंज्जे खेळत नाही. मी थोड्या दिवसाचा पाहुणा असून माझे शरीर मला साथ देत नाही. जाताना शिवनेरीची माती कपाळाला लावून जाणार आहे. परत माघारी येईल याची खात्री नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles