अहिल्यानगर महापालिकेवर दोन वर्षापासून प्रशासक असल्यामुळे नागरिकांचे मूलभूत प्रश्न वेळेवर मार्गी लागत नाही, शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे पाहायला मिळत आहे घंटागाडी आठ- आठ दिवस नागरिकांच्या घरी कचरा संकलनासाठी येत नाही नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही, १५ वर्षा पासून फेज टू योजनेचे काम सुरू आहे अजून देखील काही उपनगरामध्ये काही ठिकाणी नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळत नाही, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना नळाद्वारे पाणी देण्याची घोषणा करत आहे, मात्र प्रशासक योजनांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असतात नगर महापालिकेतील नगररचना विभागाचा सावळा गोंधळ नगरकरांनी अनुभवला आहे, नागरिकांनी जर बांधण्यासाठी महापालिकेकडे मंजुरीसाठी फाईल दिली जाते मात्र ती वेळेवर होत नाही, एकीकडे महापालिकेच्या शाळा बंद पडत आहे, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे, अमृत भुयारी गटात योजना अजून पर्यंत सुरू झाली नाही, कोट्यावधी रुपये खर्च करूनही योजना यशस्वी होताना दिसत नाही, या कामाकडे महापालिका प्रशासनाचे अक्षरशा दुर्लक्ष असून फक्त भ्रष्टाचार सुरू आहे, नगर शहरातील नागरिकांनी चांगले काम करणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहावे हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही काम करत असून आगामी निवडणुकीत महापालिका भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी शिवसेनेचा महापौर करणार, तसेच जिल्ह्यात जल जीवन पाणी योजनेसाठी केंद्र सरकारने मोठा निधी दिला होता मात्र कोणत्याही गावात ही योजना यशस्वी झालेली दिसत नाही या योजनेत ठेकेदार अधिकारी संगनमताने भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे हि योजना कार्यान्वित होणार नसून नागरिक पाण्यापासून वंचित राहणार आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी दिली.
भ्रष्टाचार मुक्त मनपा व महापौर आमचाच…शिंदेंच्या शिवसेनेचा निर्धार
0
94
Related Articles
- Advertisement -


