किरण काळे यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या पीडितेला पोलीस संरक्षण द्यावे
पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी घेतली पोलीस उपाधीक्षकांची भेट
संजय राऊत यांनी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीची पाठराखण करु नये -पवन भिंगारदिवे
राजकीय दबावाला बळी न पडता केलेल्या कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार
नगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे शहराध्यक्ष किरण काळे यांच्यावर एका महिलेने अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना पोलीसांनी सोमवारी रात्री उशीरा अटक केली. मंगळवारी (दि.22 जुलै) सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे व पिडीत महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांची भेट घेऊन पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी केली. तर राजकीय दबावाला बळी न पडता एका पिडीत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या धडाकेबाज कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
शिवसेना शहर प्रमुख किरण काळे यांनी एका पीडित महिलेचा वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर महिलेने सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांच्याकडे झालेल्या अत्याचाराबाबत माहिती देऊन मदत मागितली. भिंगारदिवे यांनी त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पीडितेला कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची मदत घेतली व किरण काळे यांच्यावर सदर महिलेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी त्यांना रात्रीच अटक केली. मात्र आरोपी हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी व गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्याकडून जीविताला धोका असल्याचा आरोप करुन पवन भिंगारदिवे यांनी स्वत:सह पिडीत महिलेला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
तर शिवसेनेचे संजय राऊत हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत आहे. मात्र त्यांनी एका पीडित महिलेवर अत्याचार झालेला असताना एका आरोपीची पाठराखण करु नये. ते एक मोठे राजकारणी असून त्यांनी उलट पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन स्वत:च्या पक्षाच्या बलात्काराचा गुन्हा असलेल्या पदाधिकारीला कठोर शासन होण्यासाठी प्रयत्न करावे. गुन्हा खोटा असता, तर पोलीसांनी तो दाखल करुन घेतला नसता. महिलेच्या आरोपामध्ये तथ्य असल्याने हा गुन्हा दाखल झाला असल्याचे भिंगारदिवे यांनी म्हंटले आहे.
किरण काळे यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या पीडितेला पोलीस संरक्षण द्यावे
- Advertisement -


