मेहुणी शेर तर भाओजी सव्वा शेर;लग्नात मेहुणी नवरदेवावर स्प्रे उडवायला गेली अन्….पाहा व्हिडिओ

भारतीय लग्न म्हटलं की फक्त पारंपरिक वाद्य, नृत्य आणि विधीच नव्हे, तर त्यात दडलेली नाती, मस्ती आणि घरगुती वातावरण ही त्याची खरी शान असते. विशेषत: नवरदेव आणि मेहुणी यांच्यातला नोक-झोंक, हटके आणि मजेशीर नातं नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतो. गाव असो वा शहर, लग्नातील या दोघांच्या मस्ती व खेळामुळे संपूर्ण वातावरणच रंगतदार बनते. अशाच एका मजेदार विधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून त्यावर लोक पोट धरून हसत आहेत.

हा व्हिडीओ ‘खिचडी’ किंवा ‘खिचड्या’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक लग्नाच्या विधीतील खेळांवर आधारित आहे. या विधित सासर-माहेरचे लोक एकमेकांशी साध्या अंदाजात खोड्या करतात. नवरीची बहीण आणि नवरदेवाकडील तरुण मंडळी यांच्यात या वेळी मजेचा छोटासा प्रकार रंगतो.

व्हिडीओमध्ये नवरीची बहीण हातात एक स्नो स्प्रे घेऊन खूपच आत्मविश्वासाने नवरदेवाला सप्राइज अटॅक देण्यासाठी तयार उभी असते. तिच्या चेहऱ्यावरचे भावच सांगत होते की काहीतरी भारी प्रकार होणार आहे. ती स्प्रेचे झाकण उघडायलाच लागते आणि एवढ्यातच नवरदेवाच्या बाजूची टीम तिच्या प्लॅनवर पाणी फेरते.मुलाकडच्यांना अगोदरच अंदाज होता की मेहुणी काहीतरी करणारच, म्हणून त्यांनी प्लान तयार ठेवला होता. ती स्प्रे मारायला सुरू करते, तोच डाव नवरदेवाची टीम क्षणात तिच्यावर पलटवते. एवढ्या वेगाने, एवढ्या जोरात स्प्रे मारला जातो की मेहुणी एका क्षणात बर्फासारख्या पांढऱ्या फेसात न्हाऊन निघते. डोक्यापासून कपड्यापर्यंत सर्वत्र फक्त स्नोच स्नो. अगदी मिनी ‘स्नो मॅन’सारखी ती दिसू लागते.


तर दुसरीकडे मुलांकडचे या ‘विजयाचा’ आनंद घेत जोरात हसत आहेत. एकूण १८ सेकंदांचा हा छोटा पण भन्नाट व्हिडीओ पाहून अनेकजण पोट धरून हसत आहेत. या व्हिडीओवर प्रतिक्रियांमध्ये लोकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काही जण म्हणताहेत, “मेहुणीला हे कधीच अपेक्षित नव्हतं!” तर कुणी लिहिलंय, “मुलांनी खेळ उलटवला”, एका युजरने मजेत लिहिलं, “या विधीतूनच लग्नाची खरी मजा कळते.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles