सभापतींच्या घरी रंगला
कौटुंबिक रक्षाबंधन सोहळा
पुण्यात जमले नातेवाईक
पुणे-विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी आज शुक्रवारी (28 ऑगस्ट) कौटुंबिक रक्षाबंधन सोहळा रंगला. यानिमित्ताने आप्तस्वकियांची मांदियाळी जमली होती. कौटुंबिक गप्पाष्टक व हास्य-विनोद यावेळी रंगले.
सभापती प्रा. शिंदे यांना तीन बहिणी आहेत. त्यांचे कुटुंबीय आज रक्षा बंधन सोहळ्यानिमित्त प्रा. शिंदे यांच्या निवासस्थानी आले होते. थोरली बहीण सौ. साखरबाई आजीनाथ भांड (रा.पोथरे, ता.करमाळा), मधली बहीण सौ.शोभा गणपत देवडे (रा.निर निमगाव, ता.इंदापूर) व धाकटी बहीण सौ.शहाबाई रवींद्र भांड (रा.पोथरे ता.करमाळा) यांनी प्रा. शिंदे यांना औक्षण करून राखी बांधली. यावेळी प्रा. शिंदे यांच्या मातुःश्री श्रीमती भामाबाई शंकरराव शिंदे व अन्य कुटुंबीय उपस्थित होते. विधानपरिषदेच्या सभापती पदासारख्या अतिमहत्वाच्या पदावर काम करतानाच, आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपली रक्ताची नाती जपण्याचे काम सभापती प्रा. राम शिंदे यांनी कौटुबीक रक्षाबंधन सोहळ्यात उत्साहाने सहभागी होत केले. यानिमित्ताने त्यांनी राज्यभरातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या. दरम्यान विधानपरिषद सभापती ना. प्रा राम शिंदे यांचे चिरंजीव अजिंक्य व मुलगी डॉ. अन्विता यांनी रक्षाबंधन सण साजरा केला


