Thursday, February 19, 2026

अजितदादांच्या राष्ट्रवादीत बंडाचा झेंडा, नगरसेविकेची स्वतंत्र गट नोंदणी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नाशिक महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेविका; तथा पक्षप्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी गटनेते पदाबाबत पक्षाने निर्णय घेतल्याचे सांगत, विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र सदस्य नोंदणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांना सोबत घेऊन चार सदस्यांचा गट स्थापन केला आहे. डॉ. पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र सदस्य नोंदणी केल्याने पक्षावर त्यांची नाराजी कायम असल्याचे चित्र आहे.महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले होते. परंतु, पक्षाने डॉ. पाटील यांच्याऐवजी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या पत्नी सीमा ठाकरे यांना गटनेतेपद दिले आहे. त्यामुळे डॉ. पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे.

दिवंगत नेते अजित पवार यांनी मला नाशिक महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता करण्याचा शब्द दिला होता, मात्र त्यांच्या निधनानंतर घाणेरडे राजकारण करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सही शिक्क्यांचा गैरवापर करून कोणीतरी बनावट पत्र बनवले आणि मला गटनेते पदापासून रोखले गेले, असा गंभीर आरोप डॉ. पाटील यांनी केला होता.

राष्ट्रवादीच्या गटापासून फारकत घेत त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा इशाराही पक्षाला दिला होता. त्यांच्या इशाऱ्याची पक्षाने दखल घेतली नसल्याने अखेर डॉ. पाटील यांनी स्वतंत्र सदस्य नोंदणी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles