राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या अपघातावरून आमदार रोहित पवार, आ. अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता अपघाताच्या संदर्भात केंद्रीय उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी एएआयबीची चौकशी लावली आहे. एएआयबी ही स्वतंत्र चौकशी संस्था असून ती केंद्रीय हवाई उड्डान मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. या चौकशी यंत्रणेला जगातील कोणत्याही चौकशी यंत्रणेची मदत मागून या अपघाताची चौकशी करता येते अशी तरतूद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. तसेच, या घटनेची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार, आता चौकशी सुरू झाल्याचे दिसून येते.
खासदार प्रफुल पटेल केंद्रीय हवाई मंत्री असताना एएआयबीची स्थापन करण्यात आली होती. आपल्या देशात विमान दुर्घटनेच्या संदर्भात स्वतंत्र चौकशी करण्याकरिता संघटना पाहिजे म्हणून या चौकशी समितीची निर्मिती करण्यात आली होती. दुर्घटनेतील सत्य समोर आलं पाहिजे आणि अपघातसंदर्भाने मुळात दोनच गोष्टी या चुकीच्या असू शकतील. एकतर वैमानिकाचा दोष किंवा विमानाचा दोष. त्यामुळे अपघाताची सगळी चौकशी झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. या पलीकडे कोणती चौकशी करण्याची समिती असेल त्याची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागणी करेन. पण, एएआयबीला चौकशीचे सर्वाधिकार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली असे वृत्त आहे एबीपी माझांने दिलं आहे असे.


