मालेगाव महानगरपालिकेतील नूतन उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानाच्या छायाचित्रावरुन वाद निर्माण झाला असताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याने या आगीत आणखी तेल ओतले जाण्याची शक्यता आहे.
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य ज्याप्रकारचं आहे, त्यांनी जो स्वराज्या विचार दिला, त्याच मांदियाळीत, त्यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्याविरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे युद्ध होऊ गेले, भारताचे भूमिपूत्र होऊन गेले, त्यांनी कधीही कोणत्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे., असे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले.
नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात 50 हजाराची लाच घेतली, हे प्रकरण फार छोटं आहे. हे संपूर्ण सरकारच लाचखोर आहे. नरहरी झिरवल यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे पण कोट्यावधी रुपये खाणारे देवेंद्र फडणवीसनवर काय कारवाई करणार हे आधी सांगा, या असंवैधानिक सरकारचा आम्ही निषेध करतो.


