लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट
केवायसी करण्याची शेवटची मुदत ३१ मार्चपर्यंत
केवायसी केल्यानंतरही हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत आता केवायसी करताना चुकी झाली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. आता महिला केवायसीतील चुक ३१ मार्चपर्यंत सुधारु शकतात. मात्र, केवायसी करुनही अनेक महिलांना पैसे मिळाले नाही. महिलांना पैसे मिळण्यास अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करताना चुका झालेल्यांसाठी पुन्हा ही प्रोसेस सुरु केली आहे. त्यामुळे अनेक महिलांना डिसेंबरपासूनचा हप्ता मिळालेला नाही. आता केवायसीत दुरुस्ती करुनदेखील महिलांना वाट पाहावी लागणार आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, ई-केवायसी करायची आहे. अर्जाची पडताळणी करुन शासन मान्यता मिळाल्यानंतरच हप्ते वितरित केले जातील. त्यामुळे महिलांना सध्या तरी पैसे मिळणार नाहीत. सध्याच्या स्थितीत ३१ मार्चनंतरच रखडलेले हप्ते दिले जाऊ शकतात. याबाबत सरकार मार्चनंतरच निर्णय घेईल,अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महिलांना रखडलेल्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांना जवळपास डिसेंबरपासूनचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे सर्व पैसे एकत्रितपणे दिले जातील. ३१ मार्चला ईकेवायसीची मुदत संपल्यानंतर महिलांना पैसे दिले जातील. ३ किंवा ४ महिन्याचे पैसे महिलांना मिळणार आहे. त्यामुळे महिलांना अजूब बरेच दिवस वाट पाहावी लागणार आहे.


