देवेंद्र फडणवीस यांना आवडतात रश्मी ठाकरे यांच्या हातचे साबुदाणे वडे!

झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांना एक खास प्रश्न विचारण्यात आला. रश्मी ठाकरे यांच्या हातचे साबुदाणा वडे देवेंद्र फडणवीस यांना खरोखरच आवडतात का? अमृता फडणवीस यांनी दिलेलं उत्तर हे राजकारणाच्या पलीकडचं त्या हसत म्हणाल्या की, ही गोष्ट अगदी खरी आहे. देवेंद्रजींना रश्मी ठाकरे यांच्या हातचे साबुदाणा वडे खूप आवडतात. एवढंच नाही, तर त्यांनी पुढे सांगितलं की, “जेव्हा खाण्याची गोष्ट समोर येते, तेव्हा देवेंद्रजी सर्व प्रकारचे राजकीय दुरावे विसरतात.” या एका वाक्यातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावातील साधेपणा आणि खाण्याविषयीची त्यांची आवड दोन्हीही स्पष्ट केली. राजकारणात वेगवेगळ्या विचारसरणी, पक्ष आणि व्यक्तींमध्ये मतभेद असणं हे साहजिक आहे. अनेकदा हे मतभेद इतके तीव्र होतात की,वैयक्तिक संबंधांवरही त्याचा परिणाम होतो. एकत्र बसून जेवणं,एखाद्या पदार्थाचा आस्वाद घेणं या गोष्टी माणसांना जवळ आणतात.

साबुदाणा वडे हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे. उपवासाच्या काळात विशेषतः हा पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ला जातो.

मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांना एक खास प्रश्न विचारण्यात आला. रश्मी ठाकरे यांच्या हातचे साबुदाणा वडे देवेंद्र फडणवीस यांना खरोखरच आवडतात का? हा प्रश्न ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील, कारण राजकारणात मतभेद आणि स्पर्धा हे नेहमीच असतात. मात्र, अमृता फडणवीस यांनी दिलेलं उत्तर हे राजकारणाच्या पलीकडचं होतं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles