लग्नात नणंद-भावजयांचा धमाकेदार डान्स; नणंद-भावजयचा व्हिडीओ

नणंद-भावजयीचं नातं म्हटलं तर प्रेमाचं, पण म्हटलं तर वादाचंही असतं. लग्न करून घरात आलेल्या मुलीला नवरा, सासू-सासरे यांच्याबरोबरच दीर व नणंदांनाही आपलंसं करून घ्यावं लागतं; मात्र त्या घरावर हक्क सांगणारी नणंद काही वेळा भांडणाचं कारण ठरते. असे म्हटले जाते की, दहा पुरुष एकत्र राहू शकतात. मात्र दोन महिला एकत्र राहू शकत नाहीत, अगदी त्या सख्ख्या बहिणी असल्या तरी. मात्र सध्या समोर आलेला नणंद-भावजयचा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल नात असं असावं.सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये दिर-वहीनी, नणंद-भावजय आदींचे डान्स व्हिडिओ लगेच प्रसिद्ध होतात. लोकांचीही अशाप्रकारच्या व्हिडिओजना विशेष पसंती मिळते. सध्या एका नणंदेचा आणि वहिनीचा डान्स व्हायरल होतोय. इतकं काय भन्नाट आहे या डान्समध्ये जाणून घेऊ…

लग्नानंतर मुलीचं आयुष्य खूप बदलतं. नवं घर, नवी नाती सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. घरात नणंद असेल, तर वाद होण्याची शक्यता जास्त असते. कारण ती त्या घरात लहानाची मोठी झालेली असते. असं असलं तरी नणंद व भावजयीचं नातं बहिणींसारखं असतं. काही वेळा तर बहिणींपेक्षाही जास्त चांगलं नातं नणंद-भावजयींचं असतं. अशाच नणंद आणि वहिनीनी भन्नाट डान्स केला आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक डान्स पाहिले असतील पण नणंद-वहिनींच्या जोडीच्या डान्सची सध्या एकच चर्चा सुरु आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नसमारंभात नणंद भावजयनं असा डान्स केला आहे की सर्वच पाहत राहिले आहेत.चोघींनीही साड्या नेसून भन्नाट ठुमके मारले आहेत. चोघीही बेभान होऊन नाचत आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा कोण ठरलं सरस..लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर siddhamkomal या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles