अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे, वंचितचे संतोष साळके आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर रावसाहेब खेवरे यांच्यासह एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. या चौरंगी लढतीमुळे राहुरीच्या राजकारणात मोठी चुरस निर्माण झाली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले, महाविकास आघाडीचे गोविंद मोकाटे आणि बंडखोर रावसाहेब खेवरे यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांनी मतदान केल्यानंतर भावूक होत सांगितले की, “बटन दाबताना साहेबांच्या (शरद पवार) आठवणी आल्या. हे मतदान म्हणजे साहेबांवरील प्रेमाचे प्रतीक आहे.” तर, शेतकऱ्याचा मुलगाच आमदार होईल, असा विश्वास खेवरे यांनी व्यक्त केला.
या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा रंगली ती माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेची. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला एक सोशल मीडिया पोस्ट केली. मात्र, यामध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा कोणताही स्पष्ट उल्लेख न करता केवळ ‘घेतलेल्या निर्णयाचा सन्मान करा’ असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे तनपुरेंची मते कोणाच्या पारड्यात जाणार, याबाबत सस्पेन्स कायम आहे.
इडीचा निवडणुकीचा जर कोणी संबंध लावत असेल तर ते त्याचा अर्थार्थी कुठलाही संबंध नाहीये ईडीची केस माझ्या एकट्यावर नव्हती राज्यातील जवळपास 50-60 जण त्याच्यामध्ये होते आणि एक वर्षभरापूर्वीच जे आर्थिक गुन्हे शाखा आहे त्यांनी सुमारे एक वर्ष भरापूर्वी याच्यामध्ये क्लीनचीट दिली होती किंवा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता तो क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने म्हणजे हा जो रिपोर्ट दिला त्यावेळेस स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झालेले नव्हते. पोटनिवडणूक लागेल हा विषय पण त्यावेळेस नव्हता एक वर्षभरापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य सरकारच्या क्लीन चिट दिली होती त्या आधारावरच काल ईडीच्या न्यायालयाने निकाल दिला आहे.
याचा अर्थ निवडणुकीची संबंध जोडने नाही. माजी मंत्री -प्राजक्त तनपुरे


