शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक ; नेमकं कारण काय?

पुण्यातील मोदीबाग बागेमध्ये शरद पवारांनी पवार कुटुंबीयांना एकत्रितपणे बोलावलं असल्याची माहिती आहे. स्नेहभोजनासाठी पवार कुटुंबातील सर्वांना एकत्रित बोलावण्यात आलं आहे अशी माहिती आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना देखील स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. पुण्यातील मोदीबाग या शरद पवारांच्या निवासस्थानी सर्वांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आज हे सर्व पवार कुटुंब एकत्रित येणार आहे, अशी माहिती आहे.या भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पवार कुटुंबातील सर्व सदस्यांना जेवणासाठी म्हणून पवारांनी आमंत्रित केलेलं आहे, शरद पवार पुण्यातील त्यांच्या मोदीबाग या निवासस्थानी आहेत, उद्या पुन्हा ते मुंबईला जाणार आहेत. आजच्या या मुक्कामा दरम्यान शरद पवारांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना जेवणासाठी म्हणून आमंत्रित केले आहे, त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न देखील ठरलेले, याचं देखील निमित्त आहे का अशी चर्चा आहे, गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर होत असलेल्या आजच्या भेटीचं नेमकं काय कारण आहे? अशी देखील चर्चा आहे. या भेटकडे सर्वांचं लक्षही लागलं आहे.

तर शरद पवार यांच्या निकटवर्तीयांकडून हा सोहळा पूर्णपणे कौटुंबिक असल्याचा सांगितलं जात आहे. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही असं सांगण्यात आलं आहे. पवार परिवारातील सर्वांना आमंत्रण देण्यात आलेला आहे, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार, त्याचबरोबर ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात नाहीत अशा सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे, पण यामध्ये प्रत्यक्ष सहभागी कोण होतं हे पहावे लागेल, सुनेत्रा पवार मुंबईत असल्याची माहिती आहे, आज त्या मुंबईत म्हणतात की या कार्यक्रमासाठी घरी येतात ते पहावे लागेल. शरद पवारांच्या घरी जमणार सगळे पवार कुटुंब जमणार आहे. पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी शरद पवारांनी पवार कुटुंबीयांना आमंत्रित केले आहे. राजकीय क्षेत्रात तसेच अराजकीय क्षेत्रात सक्रीय असलेले पवार एकत्र जमणार आहेत. शरद पवारांच्या घरी आज स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि जय पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. संध्याकाळी पाच वाजता पवार कुटुंब एकत्रित येणार आहे. रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे त्यानिमित्त भोजनाचा कार्यक्रम आहे, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार, जय पवार बाहेर आहेत, त्यामुळे ते गैरहजर राहण्याची शक्यता आहे. तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार येऊ शकतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles