भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अहिल्यानगर कोपरगाव तालुक्यातील युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कोपरगावला आता दुसरा आमदार मिळणार आहे. विवेक कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने कोल्हे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय मूळचे अहिल्या नगर जिल्ह्यातील असलेले आणि भाजपच्या संघटनेत काम करणारे निष्ठावंत सुनील कर्जतकर यांनाही भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. कर्जतकर हे मूळचे जामखेड तालुक्यातील नान्नज जवळा येथील आहेत. कर्जतकर यांच्या रूपाने कर्जत जामखेड मतदारसंघाला तिसरा आमदार मिळाला आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यात विधानसभेचे 12 आमदार असून आता विधानपरिषदेतही नगर जिल्ह्यातील 5 आमदार झाले आहेत.
कर्जत जामखेड मतदारसंघाचे माजी आमदार प्रा राम शिंदे यांनाही भाजपने विधानपरिषदेत आमदार करून नंतर सभापतीपदही दिले आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील सत्यजित तांबे नाशिक पदवीधर मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे हे सुद्धा विधानपरिषदेचे आमदार आहेत. ते मूळचे पाथर्डी तालुक्यातील आहेत. गर्जे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत ्…


