पाथर्डी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस लाचलुचपतच्या जाळ्यात

पाथर्डी-पाथर्डी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या कारवाईत एका पोलिसाला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा कर्मचारी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला आहे. या प्रकारामुळे पाथर्डी पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदाराच्या अपघातग्रस्त वाहनाची सुटका करून देण्यासाठी संबंधित पोलिसांनी पैशांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. बुधवारी दुपारी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रारदाराकडून पैसे घेताना ही घटना घडली असून यामध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल व पोलीस कॉन्स्टेबल या कारवाईत दोन पोलीस कर्मचारी सापडले असून एक कर्मचारी कारणास्थळावरून पसार झाला आहे. एकाला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles