मोठी बातमी!अक्षय कर्डिले यांचा शानदार विजय
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यात अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे.राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यात अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे. अक्षय कर्डिले यांचा सामना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटे यांच्याशी झाला होता. या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांनी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे.
टपाल मतमोजणीपासूनच भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपले वर्चस्व राखले होते. त्यानंतर ईव्हीएम च्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. दुसऱ्या फेरीअखेर प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी प्रतिस्पर्ध्यांवर तब्बल ९,६३७ मतांची लक्षणीय आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांनी मिळवलेल्या मतांमुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अठराव्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले 90 हजार 638 मतांनी आघाडीवर.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासूनच एकतर्फी वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाल्यापासून भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी घेतलेली आघाडी प्रत्येक फेरीगणिक सुसाट वाढत असून, अठराव्या फेरी अखेर त्यांनी विजयाच्या दिशेने मोठा टप्पा गाठला आहे.


