मोठी बातमी!अक्षय कर्डिले यांचा शानदार विजय ; अक्षय कर्डिले म्हणाले ,ही निवडणूक नव्हतीच तर …..

राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले एक लाख ११ हजार ८२६ मतांनी विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २७ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिले यांना एकूण १ लाख ३९ हजार २१२ मते मिळाली आहेत. भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपाने स्व. शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली. अक्षय कर्डिले यांची ही राजकीय कारकीर्द ठरवणारी पहिलीच निवडणूक आहे.

२४ व्या फेरी अखेर मिळालेली मते
अक्षय कर्डिले (भाजपा ) – १,३९,२१२
गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी शरद पवार) – २७,३८६
संतोष चोळके (वंचित) – ५,६६३
रावसाहेब खेवरे (अपक्ष) – ७,२३४
(अक्षय कर्डिले – एक लाख ११ हजार ८२६ मतांनी विजयी)

पहिल्या फेरीत अक्षय कर्डिले यांना ४,९८८ मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटे यांना केवळ ७२२ मते मिळाली. पहिल्या फेरीअखेर कर्डिले यांना ४,२६६ मतांची आघाडी मिळाली. कर्डिले यांना पहिल्या फेरीपासून मिळालेली आघाडी सोळाव्या फेरीअखेर कायम राहिली. अखेर २७ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिले एकूण १ लाख ३९ हजार २१२ मते मिळवत विजयी झाले.

दरम्यान निकालाच्या काही वेळापूर्वी कर्डिले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “जनतेने दाखवलेला विश्वास आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करू. ही निवडणूक सर्वसामान्यांनी हातात घेतली होती. ही निवडणूक नव्हतीच तर प्रत्येक मतदाराने आपली स्व. शिवाजी कर्डिले यांच्या प्रति असलेली भावना मतातून व्यक्त केली आहे. गेली ३० वर्षे कर्डिले यांनी प्रत्येक कुटुंबात, प्रत्येकाच्या हृदयात घर केले होते, स्थान मिळवले होते. आज ते आपल्यासमवेत नाहीत. परंतु तेवढेच प्रेम, विश्वास जनतेने माझ्याबद्दल दाखवून मला संधी दिली आहे. आगामी काळात जनतेने दिलेली संधीचा उपयोग आपणही प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करू”, असे अक्षय कर्डिले म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles