इंस्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; नगर तालुक्यातील घटना……

​अहिल्यानगर- सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून एका तरुणीला विवाहाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात मयुर बाळकिसन दरेकर (रा. वाळुंज, ता.नगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २४ वर्षीय तरुणी ही नर्स असून रांजणगाव गणपती येथे एका रुग्णालयात काम करते. त्या तरुणीची आणि आरोपी मयुर दरेकर यांची दोन वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर आरोपीने तरुणीला विवाहाची मागणी घातली. मात्र, पीडितेने लग्नास नकार दिला. त्यानंतर आरोपीने पीडितेचे फोटो सोशल मिडीयावर प्रसारित करण्याची धमकी दिली व तिला भेटायला नगरला बोलावले. भीतीपोटी पीडितेने आरोपीचे ऐकले. आरोपीने तिला आरणगाव परिसरातील एका लॉज वर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.

​या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मयुर दरेकर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी आणि नगर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles