Ahilyanagar….आणखी एक भोंदूबाबा गजाआड ;तंत्र मंत्राच्या साह्याने महिलेची 16 लाख रुपयांची फसवणूक

अहिल्यानगर : तंत्र मंत्राच्या साह्याने उतारे काढून जडीबुटी खाण्यास देऊन सुमारे 15 ते 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तालुक्यातील पूर्व भागातील व सध्या शहरात वास्तव्यास असलेल्या एका भोंदू बाबाला गजाआड केले आहे.अशोक आढाव असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव असून तो मूळचा तालुक्यातील टाकळीभान येथील रहिवासी असून सध्या तो श्रीरामपूर शहरातील अल्फा हॉस्पीटल मागील झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी तालुक्यातील पूर्व भागातील एका महिलेने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, फेब्रुवारी 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये भोंदू अशोक आढाव याने मला होत असलेल्या त्रासावर तंत्र-मंत्राच्या साह्याने उतारे काढून जडीबुटी खाण्यास देऊन दक्षिणा स्वरूपात व ऑनलाईन पद्धतीने सुमारे 15 ते 16 लाख रुपये, सोन्याच्या वस्तू घेतल्या, तसेच मी राहत असलेल्या घरी माझ्याकडून शरीर सुखाची मागणी करून मला पकडून माझ्याशी लगट करून मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी भोंदूबाबा अशोक आढाव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, 75 प्रमाणे नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंधक करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भोंदूबाबा अशोक आढाव यास अटक करुन न्यालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. अरिफ शेख व अ‍ॅड. जावेद शेख यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवटे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles