इंस्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; नगर तालुक्यातील घटना……

​अहिल्यानगर- सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून एका युवतीला लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित 24 वर्षीय युवतीच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये शुक्रवारी (8 मे) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर बाळकिसन दरेकर (रा. वाळुंज, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी युवती मुळची अमरावती जिल्ह्यातील असून ती सध्या शिरूर (जि. पुणे) तालुक्यात राहते. तिची मयुर दरेकर याच्यासोबत सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर त्याने युवतीकडे विवाहाची मागणी घातली. मात्र, युवतीने विवाह करण्यास नकार दिला. त्यानंतर मयुर याने पीडितेचे फोटो समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी पीडितेने मयुरचे ऐकले.

मयुरने तिला अरणगाव (ता. अहिल्यानगर) परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मयुर दरेकर याच्याविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपअधीक्षक (अहिल्यानगर ग्रामीण) शिरीष वमने या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles