पेपरफुटीच्या गंभीर आरोपानंतर नीट २००६ (NEET 2026) रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा महत्त्वाची आहे. पण त्यामध्येच पेपरफुटीचा गंभीर आरोप झाल्याने केंद्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.गेल्या काही दिवसांपासून देशभरातून नीट परीक्षेचे पेपर लीक झाल्याच्या तक्रारी येत होत्या. परीक्षेच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण आहे? पेपर लीकचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे? याचा छडा सीबीआय लावणार आहे.नीट २०२६ ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नीट २०२६ चा पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. आता याप्रकरणी सीबीआय चौकशी होणार आहे. नीटची परीक्षा रद्द करुन ती पुन्हा घेण्यात येणार आहे. पेपर फुटल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला आहे. मात्र, आता ही परीक्षा कधी घेण्यात येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे,
परीक्षा रद्द का झाली?
देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी यंदा ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा दिली होती, महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचे आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही परीक्षा रद्द करणे आवश्यक असल्याचे ‘एनटीए’ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
अखेर ‘नीट’ परीक्षा रद्द; पेपरफुटीची CBI चौकशी होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- Advertisement -


