महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचा धुरळा; अहिल्यानगरसह १७ विधानपरिषदेच्या रिक्त जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

राज्यात पुन्हा एखादा निवडणुकीचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्यानंतर आता विधानपरिषदेच्या रिक्त जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी भर पडणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसंदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पार पडल्या नव्हत्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित मतदारसंघातन निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुकांची घोषणा झालेली नव्हती. मागील अडीच वर्षांपासून या जागा रिक्त होत्या.

काही महिन्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न झाल्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात किमान ७५ टक्के मतदार उपलब्ध असणार आहेत. ही अट पूर्ण झाल्याने निवडणुकीची प्रकियेस सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित १७ जागांसंदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोणत्या मतदारसंघासाठी विधानपरिषद निवडणूक जाहीर होऊ शकते?
– अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, जळगाव, सांगली- सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया
– रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, परभणी-हिंगोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, संभाजीनगर-जालना
नागपूर

विधानपरिषदेच्या एकूण ७८ सदस्य संख्येपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. यापैकी सध्या १७ जागा रिक्त आहेत. त्यामुळे या मतदारसंघात निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीकडे राजकीय पक्षाचं लक्ष लागलं आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी निवडणुका पार पडल्यास विधानपरिषदेतील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्वराज संस्थांमधील सत्तासमीकरणाचा परिणाम विधानपरिषदेच्या निवडणुकीवर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्ष बाजी मारेल, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles